Shampoo, soap, lotion may cause cancer: आपण रोज जे शैम्पू, साबण, बॉडी लोशन किंवा फेसवॉश वापरतो, ते आपल्या त्वचेसाठी चांगले असतील असं वाटतं ना? पण अलीकडच्या एका स्टडीने धक्कादायक गोष्ट समोर आणली आहे. हेच प्रोडक्ट्स कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराचं कारण ठरू शकतात.
नेमकं काय सापडलं या अभ्यासात?
‘Environmental Science and Technology Letters’ या जर्नलमध्ये छापून आलेल्या एका स्टडीमध्ये 70 महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असं समोर आलं की 53% महिला दररोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा असे प्रोडक्ट्स वापरत होत्या, ज्यामध्ये फॉर्मेल्डिहाइड आणि फॉर्मेल्डिहाइड रिलीज करणारे केमिकल्स (FRPs) होते. हे केमिकल्स शरीरात गेल्यावर कॅन्सर होण्याचा धोका वाढवतात.
हे केमिकल्स कुठे सापडतात?
हे केमिकल्स शैम्पूमध्ये, बॉडी लोशनमध्ये, फेस क्लिन्झर, आणि डोळ्यांचे आयलॅश ग्लू यामध्ये आढळतात. DMDM Hydantoin नावाचं केमिकल यामध्ये जास्त प्रमाणात सापडतं. हे प्रोडक्ट्स जास्त दिवस टिकावेत म्हणून कंपन्या हे वापरतात.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
या स्टडीच्या प्रमुख डॉ. रॉबिन डॉडसन म्हणाल्या, 'हे केमिकल्स आपल्याला रोजच्या वापरात लागतात. त्यामुळे त्याचा दीर्घकाळ शरीरावर वाईट परिणाम होतो.' त्यामुळं त्वचेला इजा होणं, श्वसनाचा त्रास, आणि कॅन्सरची शक्यता वाढू शकते.
हे केमिकल्स ओळखायची सोपी युक्ती:
या केमिकल्सची नावं खूप कठीण असतात. जसं की DMDM Hydantoin, Diazolidinyl Urea, Imidazolidinyl Urea. हे शब्द प्रोडक्टवर असतात, पण आपण ते दुर्लक्ष करतो.
हेही वाचा:Today's Horoscope: सोमवार काय घेऊन आलाय तुमच्यासाठी? वाचा राशीभविष्य
काय काळजी घ्यावी?
1. प्रोडक्ट घेताना त्याचे घटक (Ingredients) नक्की वाचा.
2. जेव्हा शक्य असेल, तेव्हा हर्बल किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरा.
3. ‘Formaldehyde-Free’ किंवा ‘No Harmful Chemicals’ असं लेबल असलेले प्रोडक्ट्स निवडा.
थोडक्यात सांगायचं झालं तर; आपण बाहेरून सुंदर दिसतो, पण त्यासाठी वापरले जाणारे प्रोडक्ट्स आपल्या शरीरात हळूहळू विष पसरवत असतील तर? म्हणूनच अगदी नेहमी वापरायच्या गोष्टी शैम्पू, साबण, लोशन घेण्याआधी दोन मिनिटं काढून त्यात काय आहे ते जरूर बघा.
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.