Thursday, February 12, 2026 02:53:36 PM

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या वैमानिकांना किती अनुभव होता? विमान कोणत्या कंपनीचे?

आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले. त्यांच्या सोबत असणारे अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचा वैमानिक अनुभव किती ते जाणून घ्या

ajit pawar plane crash  अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या वैमानिकांना किती अनुभव होता विमान कोणत्या कंपनीचे

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले. विमान वाहतूकतज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करत होते. त्या वेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत असणारे अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचा वैमानिक अनुभव किती ते जाणून घ्या... 

हेही वाचा- Ajit Pawar Statement About Pilot: 'वैमानिकाचा निरोप आला की जावं लागतं…'; अजितदादांच्या 'त्या' शब्दांनी आज काळजाचा ठोका चुकला, जुना व्हिडिओ व्हायरल
वैमानिकांचा अनुभव
अजित पवार ज्या विमानात होते ते विमान दिल्लीतील एक खाजगी विमान कंपनीतील व्हीएसआर व्हेंचर्सच्या मालकीचे लिअरजेट 45 विमान होते. अजित पवारांसोबत असणारे अनुभवी पायलट सुमित कपूर हे विमानाचे मुख्य पायलट होते तर शांभवी पाठक या सहपायलट होत्या. दरम्यान शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमधील न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी कडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळाले. 2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी तेथे व्यावसायिक उड्डाणाचे (प्रोफेशनल फ्लायिंग) प्रशिक्षण पूर्ण केले.


सम्बन्धित सामग्री