Maharashtra HSC Result 2025 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता. राज्यभरातून 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मार्चमध्ये परीक्षा शांततेत पार पडल्या.<br/>

Maharashtra HSC Result 2025 Date:  बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निकालाची तारीख जाहीर

मुंबई:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून बारावीच्या (HSC) निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यभरातून जवळपास 14 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या असून, आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही निकालाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:

1. https://mahresult.nic.in
2. https://hscresult.mkcl.org
3. https://results.gov.in
4. https://msbshse.co.in

वरील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून निकाल पाहता येईल. काही खासगी अ‍ॅप्स आणि पोर्टल्सद्वारे देखील निकाल पाहता येईल.

पालक व विद्यार्थ्यांनी काय लक्षात घ्यावे?

निकालाच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे आहे. ऑनलाईन निकाल ही तात्पुरती माहिती असते, मूळ मार्कशीट शाळेतून काही दिवसांनी दिली जाईल. तसेच, निकालानंतर पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेवर भर देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल केवळ गुणपत्रक नसून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्यातील वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे निकालाच्या निकालाच्या तयारीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number