नागपूर : संशय हा सुखी संसाराचा खरा शत्रू ठरतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला अतिशय अमानुष मारहाण केल्याचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पत्नीला मारहाण करत संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव लक्ष्मी रोशन शहाकार असून आरोपी पतीचे नाव हे रोशन शहाकार आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही संपूर्ण संतापजनक घटना घडली आहे.
प्रेमविवाहानंतरही विश्वासघात
धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी रोशन शहाकार खरं तर सुरुवातीपासूनच पार्श्वभूमीचा आहे. 2006 मध्ये एका खून प्रकरणाता तो आरोपी होता. त्या खटल्यातून निर्दोष सुटल्यावर त्याने आपल्याच नात्यातील लक्ष्मी हिच्याशी लग्न केले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊ लागला. याच एका कारणावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे.
गुरुवारी अर्थात घटनादिवशी ही दोघांमध्ये याच कारणावरुन जोरदार वाद झाला. रागाच्या भरात रोशनने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. मारहाण इतकी जबर होती की लक्ष्मीची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. प्रकृती बिघडताच त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलेय मात्र, उपचारादरम्यान लक्ष्मीचा मृ्त्यू झाला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रोशनला ताब्यात घतेला आहे. दु:खत गोष्ट म्हणजे या घटनेमुळे लक्ष्मीच्या 3 आणि 7 वर्षांच्या दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र कायमचे हरपले असून पोलिस पुढील तपास करत आहत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.