Ganeshotsav 2026 : BMC सज्ज! दीड दिवसांच्या घरगुती गणरायाचे आज विसर्जन; मुंबईत 383 कृत्रिम तलावांसह विसर्जनस्थळी 1,132 जीवरक्षक तैनात

मुंबई : गणेश चतुर्थीला देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून बहुतांश घरगुती गणपतींचे आज विसर्जन होणार आहे. गणरायाच्या आगमनानंतर दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि विसर्जन व्यवस्थेसाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा विसर्जनासाठी 67 नैसर्गिक स्थळांसह 383 कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. तीन हजारांहून अधिक सफाई कर्मचारी, […]

Ganeshotsav 2026 : BMC सज्ज! दीड दिवसांच्या घरगुती गणरायाचे आज विसर्जन; मुंबईत 383 कृत्रिम तलावांसह विसर्जनस्थळी 1,132 जीवरक्षक तैनात

मुंबई : गणेश चतुर्थीला देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून बहुतांश घरगुती गणपतींचे आज विसर्जन होणार आहे. गणरायाच्या आगमनानंतर दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि विसर्जन व्यवस्थेसाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा विसर्जनासाठी 67 नैसर्गिक स्थळांसह 383 कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. तीन हजारांहून अधिक सफाई कर्मचारी, मोबाईल कचरा गाड्या तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी 498 निर्माल्य कलश व 326 निर्माल्य वाहन आणि विसर्जन स्थळी 1,132 लाइफ गार्ड तैनात असणार आहेत. मुंबईत दरवर्षी 12 हजारांहून अधिक सार्वजनिक आणि दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनाला महापालिका काही महिने आधीपासूनच सुरुवात करते. यंदाही पोलीस, बेस्ट, गणेशोत्सव मंडळे, वीज वितरण कंपनी तसेच अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जनस्थळी गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 228 नियंत्रण कक्ष, 1,132 जीवरक्षक, 10 मोटरबोटी, 23 जर्मन तराफे, 6,052 फ्लडलाइट तसेच सर्चलाइट, 236 प्रथमोपचार केंद्रे, 75 निरीक्षण मनोरे आणि 85 रुग्णवाहिका तैनात आहेत.

हेही वाचा : Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? आज SC त महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदेंचे वकील कोर्टात बाजू मांडणार

तर पुण्यातही दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण असल्याचे समजते. काल लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर भक्तांनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणरायाची सेवा केली. आज दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून पांचाळेश्वर आणि पतंग घाट परिसरात विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कृत्रिम हौदांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, हौदांचा परिसरही स्वच्छ करून घेण्यात आला आहे. दुपारी बारानंतर दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. विसर्जनापूर्वी या हौदांवरील तयारीचा आढावा घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number