Jalgaon Crime : बाळ अंध जन्माला आल्याचा राग अनावर! सासू-पतीने निष्पाप बाळासह आईसोबत केलं थरकाप उडवणारं कृत्य; चिमुरड्याचा मृत्यू, आई….

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंध बाळ जन्माला आल्याच्या रागातून पतीने आणि सासूने मिळून अंध पत्नीसह बाळाला विहिरीत ढकले. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime : बाळ अंध जन्माला आल्याचा राग अनावर! सासू-पतीने निष्पाप बाळासह आईसोबत केलं थरकाप उडवणारं कृत्य; चिमुरड्याचा मृत्यू, आई….

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंध बाळ जन्माला आल्याच्या रागातून पतीने आणि सासूने मिळून अंध पत्नीसह बाळाला विहिरीत ढकले. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात, किनगाव येथे ही अत्यंत खळबळ उडवणारी घटना घडली असून यावल पोलिसांनी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय 27, रा. किनगाव) यानी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सासू आशाबाई भागवत पाटील यांनी त्यांना आणि त्यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकलले. या कृत्यात पती स्वप्निल भागवत पाटील याचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सरस्वती पाटील या 70 टक्के अंध असून त्यांचा पती देखील 100 टक्का अंध आहेत. सरस्वती गरोदर असताना केलेल्या सोनेग्राफीमध्ये बाळ अंध असल्याचं स्पष्ट झाल्यावर ही सर्वस्वती यांनी बाळाला जन्म देण्याचा आग्रह कायम ठेवला.

हेही वाचा- Navi Mumbai Crime: अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट! पत्नी-प्रियकराने पतीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे; 11 महिन्यांनी उलगडलं थरारक रहस्य

ज्यामुळे दोघांना एक साडेतीन वर्षाचे अंध बाळं झालं होतं. त्यामुळे पती पत्नीमध्ये गेल्या काही महिन्या पासून मोठा कलह निर्माण झाला होता. याचाच राग अनावर झाल्याने सासू आणि पतीने आपल्या अंध पत्नीसह आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून दिल्याने त्यात पत्नी गंभीर तर मुलगा ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता, एक महिला आणि मुलगा विहिरीत पडल्याचे दिसून आले होते.

या दोघांना बाहेर काढले असता, साडेतीन वर्षाचा अंध मुलगा मयत झाल्याचं दिसून आले तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. दोघेही अंध असल्याने सुरुवातीला हा अपघात असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता.  मात्र जखमी असलेल्या सरस्वती पाटील यांनी घडल्या घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी सासू आशाबाई पाटील आणि तिचा अंध पती स्वप्नील पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number