Thursday, February 12, 2026 03:30:08 AM

Ladki Bahin Yojana : नंदुरबारमध्ये 'लाडकी बहीण' योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; ई-केवायसीमुळे उघड पडलं पितळ

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 710 पुरुषांनी अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आला आहे.

ladki bahin yojana  नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज ई-केवायसीमुळे उघड पडलं पितळ

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 710 पुरुषांनी अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आला आहे. महिलांसाठी असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत पुरुषांनी शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे आणि ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून सर्व अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

नेमकी चूक कुठे झाली?
प्रशासनाने केलेल्या तपासणीत या 710 अर्जांमागे 'तांत्रिक चूक' असल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. अर्ज भरताना लिंग (Gender) निवडण्याच्या पर्यायामध्ये महिला ऐवजी 'पुरुष' हा पर्याय चुकून निवडला गेला. ही चूक जाणीवपूर्वक होती की अनावधानाने, याबाबत चर्चा सुरू असली तरी तांत्रिक पडताळणीत हे अर्ज बाद झाले आहेत.

ई-केवायसी ठरली 'गेम चेंजर'
या योजनेचा पैसा चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती. आधार कार्डवरील माहिती आणि अर्जातील माहिती जुळली नसल्याने ई-केवायसी स्तरावरच हे 710 पुरुष अपात्र ठरले. यातील एकाही पुरुष अर्जदाराला या योजनेचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार आणि निधीचा गैरवापर टळला आहे.

हेही वचाा - Sharad and Parth Pawar Meeting: विद्या प्रतिष्ठानचा 'विश्वस्त' कोण? जय की पार्थ पवार... शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

प्रशासनाची सतर्कता
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने अधिक कडक धोरण अवलंबले आहे. आता प्रत्येक अर्जाची सूक्ष्म पातळीवर तपासणी करण्याचे आदेश महिला आणि बालकल्याण विभागाने दिले आहेत. केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जात आहे.

ई-केवायसी (E-KYC) कशी करावी? (स्टेप-बाय-स्टेप)
जर तुम्ही अद्याप पडताळणी केली नसेल, तर या सोप्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करा:

वेबसाइट: ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.
पर्याय: 'ई-केवायसी' या टॅबवर क्लिक करा.
माहिती: आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड अचूक भरा.
ओटीपी: आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP नमूद करा.
सबमिट: पडताळणी यशस्वी झाल्यावर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
 


सम्बन्धित सामग्री