Pune Crime News : तब्बल 16 राऊंड फायर, गोळी थेट डोक्यात….; देहूरोडमध्ये रक्तरंजित शेवट, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

मावळातील देहूरोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे.

Pune Crime News : तब्बल 16 राऊंड फायर, गोळी थेट डोक्यात….; देहूरोडमध्ये रक्तरंजित शेवट, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

मावळातील देहूरोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. रात्री पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय समोर उभ्या असलेल्या रमेश रेड्डीवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी तब्बल 16 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी थेट डोक्यात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने आधार  रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे देहूरोड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रमेश रेड्डी यांच्या भावाची देखील गोळीबारात हत्या झाली होती. त्या प्रकरणाशी या हत्येचा काही संबंध आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number