Shashikant Shinde On Ladaki Bahin Yojna : "दादांना श्रद्धांजली म्हणून आता या योजनेला…" चालू अधिवेशनात शशिकांत शिंदेंनी केली मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?

राज्यात आजपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे.

Shashikant Shinde On Ladaki Bahin Yojna : &quotदादांना श्रद्धांजली म्हणून आता या योजनेला…&quot चालू अधिवेशनात शशिकांत शिंदेंनी केली मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?

राज्यात आजपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनातील वातावरण भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्याप्रमाणे अजित पवार यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. यावेळी सर्वच नेते खूप भावूक झालेले दिसून आले. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत, या योजनेला अजित पवार यांचं नाव द्यावं अशी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांच्या नावातच दादा आहे, त्यामुळे या योजनेला दादांचं नाव दिलं तर हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे विधान देखील त्यांनी अधिवेशनात केले आहे.

हेही वाचा- Devendra Fadnavis: ’60 मिनिटं आणि ती शेवटची भेट…’; अजित पवारांच्या ‘त्या’ आठवणीने देवेंद्र फडणवीसांच्या भावनांचा फुटला बांध
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, “सध्याच्या राजकारणात आपण तडजोड करतो तेव्हा सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रचं भवितव्य घडवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात… विचारांशी तडजोड त्यांनी कधीही केली नाही… सध्याच्या राजकारणात शिस्त टिकली पाहिजे, नेतृत्वाच अस्तित्व लोकांमुळे मिळते… सध्याच्या राजकारणात विलनिकरणाची चर्चा होते, दादा हळवे होते… पवार साहेबांना त्यांनी देव मानलं, पक्ष विभागले जरी असले तरी साहेबांच्या मनातलं प्रेम कमी झालं नाही… साहेबांची बैठक व्हायची तेव्हा आदल्या दिवशी आमचा फोन झाला, आताच्या काळात पवार साहेबांबद्दल हळवेपणा वाढलेला… आतमधून जे दादा हळवे होते त्याची प्रचिती आम्हाला आली… महाराष्ट्रला प्रगती ते करू शकणारे होते.. दादांच्या जाण्यानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा वाहिनी यांनी घेतली.. दादांची उणीव त्या भासू देणार नाही… दादांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे… त्यांची उणीव आम्हाला सातत्याने दिसेल…”

हेही वाचा- Uddhav Thackeray Emotional For Ajit Pawar : ‘मी माझा चांगला मित्र गमावला…’, अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाले उद्धव ठाकरे
या योजनेला त्यांचं नाव दिलं तर बरं होईल-शशिकांत शिंदे 
“त्याबरोबर पक्ष संघटना आणि सरकारमध्ये दादा असावे अशा प्रकारची भावना आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्यामुळे आम्ही काही लोकांनी पुढाकार पण घेतला आणि त्यांची धास्ती सुद्धा असायची… कौटुंबिक प्रेम करणारे दादा आम्ही पाहिले… महाराष्ट्रात सध्या देशाच्या राज्याच्या असलेल्या प्रश्नाबाबत गांभीर्याने पाहायचे… अनेक योजनेमुळे राज्यावर खर्च वाढलेले पण बेलेन्स करताना सहकाऱ्यांची नाराजी चालेल पण राज्य नीट चालले पाहिजे हे त्यांच्यासाठी महत्त्वच होत… अजित दादा यांच्या नावात दादा असल्याने त्या लाडकी बहिणींच्या योजनेला नाव देणे हीच खरी श्रद्धांजली असेल”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number