Sunday, July 13, 2025 10:50:01 AM

धूप-उदबत्ती लावताना वाटतं समाधान, पण शरीरात वाढतोय 'हा' घातक आजार...वाचा संपूर्ण सत्य

धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.

धूप-उदबत्ती लावताना वाटतं समाधान पण शरीरात वाढतोय हा घातक आजारवाचा संपूर्ण सत्य

Long-Term Side Effects Of Incense And Dhoop Exposure: आपल्या घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी धूप किंवा उदबत्ती लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. देवपूजा, प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा यासाठी अनेकजण उदबत्ती किंवा धूप लावतात. अनेकांना वाटतं, सुगंधाने वातावरण शांत आणि आल्हाददायक होतं. मात्र, यामागे लपलेला आरोग्याचा एक गंभीर धोका आता समोर आला आहे.

धूप लावणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तर केमिकल्सचा धूरही

धूप किंवा अगरबत्ती जळत असताना केवळ सुगंध नाही, तर हानिकारक रसायनांचा धूरदेखील तयार होतो. संशोधनानुसार, यातून PAH (Polycyclic Aromatic Hydrocarbons), बेंझीन, टोल्युइन, कार्बन मोनोऑक्साइड आणि इतर विषारी पदार्थ निघतात. यांचा परिणाम थेट आपल्या फुफ्फुसांवर आणि श्वसनमार्गांवर होतो.

नैसर्गिक आणि कृत्रिम उदबत्तीमधला फरक ओळखा

पूर्वीच्या काळात नैसर्गिक घटकांपासून गाईचं शेण, चंदन, गुग्गुळ, औषधी वनस्पती, तुप अशा घटकांपासून धूप तयार होत असे. याचा सुगंध मृदू आणि सुसह्य असे. पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या उदबत्त्या आणि धूपकांड्या अनेकदा टाकाऊ लाकूड, रंगीत पावडरी आणि कृत्रिम सुगंधी तेलांनी बनवल्या जातात. हे घटक जळताना अधिक धूर निर्माण करतात; जो केवळ डोळ्यांना त्रास देत नाही, तर दीर्घकालीन त्रासदायकही ठरतो.

हेही वाचा: Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती

डॉक्टरांचा इशारा- सतत धूप लावल्याने आरोग्यावर विपरित परिणाम

आयुर्वेदिक चिकित्सकांच्या मते, जर घरात दररोज धूप किंवा अगरबत्ती जाळली जात असेल, तर घरातल्या हवेचा दर्जा खालावतो. त्यातून डोळ्यांतून पाणी येणे, सर्दी-खोकला, दम्याचे त्रास, अ‍ॅलर्जी, त्वचाविकार आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका देखील वाढतो.

जगभरातील अभ्यास काय सांगतात?

चीनमधील एका मोठ्या अभ्यासात असे दिसून आले की, धूपाच्या धुराच्या संपर्कात असलेल्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे – विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा धोका दुपटीने वाढतो. थायलंडमधील मंदिरातील कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासातूनही असाच निष्कर्ष समोर आला आहे.

हेही वाचा:Weekly Horoscope June 22 to June 28: बुध ग्रह बदलणार नशीबाचा खेळ! जाणून घ्या तुमचं आठवड्याचं राशिभविष्य

हेही वाचा:Today Horoscope: तुमची रास काय सांगते? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

काय करावं? उपाय काय?

– शक्यतो नैसर्गिक घटकांनी बनवलेली उदबत्ती किंवा धूप वापरा
– घरात लावताना खिडक्या उघड्या ठेवा
– लहान मुलं, वृद्ध, किंवा दम्याचे रुग्ण असतील तर धूप टाळा
– रोजच्या वापराऐवजी प्रसंगी किंवा विशिष्ट विधींमध्येच वापर करा

धूप आणि उदबत्ती हे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असले, तरी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित प्रमाणातच करायला हवा. फक्त सुगंधासाठी आरोग्याशी तडजोड करणं खरोखर आवश्यक आहे का? या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा.


सम्बन्धित सामग्री