Koyna Water Release: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ; 24 तासांत विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या केवळ 24 तासांच्या कालावधीतच धरणात तब्बल 4.23 टीएमसी नव्या पाण्याची आवक झाली आहे.

Koyna Water Release: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ; 24 तासांत विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Water Release: सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी धुवाधार सरींचे सत्र अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जलसागरातील (कोयना धरण) पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या केवळ 24 तासांच्या कालावधीतच धरणात तब्बल 4.23 टीएमसी नव्या पाण्याची आवक झाली आहे. यामुळे धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा आता 91.31 टीएमसीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या धरण क्षेत्रांत पावसाची हजेरी कायम असल्याने धरणाची जलपातळी वेगाने उंचावत आहे.

धरणाचे वक्र दरवाजे 6 फुटांवर; नदीपात्रात मोठा विसर्ग
धरण क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेऊन आणि पाणीपातळीचे योग्य नियंत्रण राखण्यासाठी पाटबंधारे विभागाने मध्यरात्री 12 वाजता धरणाचे सहा दरवाजे 6 फुटांपर्यंत वर उचलले आहेत. सध्या हे दरवाजे याच स्थितीवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सांडव्यावरून थेट नदीपात्रात 32,776 क्युसेक तर पायथा जलविद्युत केंद्रातून 1,050 क्युसेक असा एकूण 33,826 क्युसेक इतका प्रचंड विसर्ग कोयना नदीत सोडला जात आहे. पाण्याचा हा प्रवाह असाच सुरू राहिल्याने पुढील काळात विसर्गात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट! 81 मध्यम धरणांत फक्त 21 टक्के पाणीसाठा

24 तासांतील पावसाची नोंद आणि नद्यांच्या पातळीत वाढ

दरम्यान, 24 तासांच्या आकडेवारीनुसार, कोयनानगर भागात 63 मिमी, नवजा परिसरात 55 मिमी आणि महाबळेश्वर येथे सर्वाधिक 88 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सातत्याने सोडल्या जाणाऱ्या या मोठ्या प्रवाहामुळे कोयना आणि कृष्णा या दोन्ही प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कऱ्हाड व लगतच्या नदीकाठच्या परिसरातील पाणी वाढल्याने प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीपात्रात उतरणे टाळावे आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number