देशात शुक्रवारी ४४ हजार १११ नवे कोरोनाबाधित

देशात शुक्रवारी ४४ हजार १११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी देशात ७३८ कोरोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाची एकूण […]

देशात शुक्रवारी ४४ हजार १११ नवे कोरोनाबाधित

देशात शुक्रवारी ४४ हजार १११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी देशात ७३८ कोरोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाची एकूण मृत्युसंख्या ४ लाख १ हजार ५० इतकी झाली आहे. शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्ण बरे होऊन घारी परतले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ इतकी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्क्यांवरपोहोचले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number