Honeymoon Coach : फुगे-फुलांचं डेकोरेशन, रेल्वेचा कोच बनला हनिमून सूट; व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई

नवी दिल्ली : नांदेडग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कूपेची नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हनीमून सूट’प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या सजावटीला रेल्वेची परवानगी होती का? डेकोरेशन टीमला एसी डब्यात प्रवेश कसा मिळाला? सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी रेल्वेने विभागीय चौकशी सुरू केली असून, […]

Honeymoon Coach : फुगे-फुलांचं डेकोरेशन, रेल्वेचा कोच बनला हनिमून सूट; व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई

नवी दिल्ली : नांदेडग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कूपेची नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हनीमून सूट’प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या सजावटीला रेल्वेची परवानगी होती का? डेकोरेशन टीमला एसी डब्यात प्रवेश कसा मिळाला? सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी रेल्वेने विभागीय चौकशी सुरू केली असून, प्राथमिक कारवाईत संबंधित CTI/TTE यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Earthquake : महाराष्ट्र हादरलं! नांदेड, परभणीत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; हिंगोलीत भूकंपाचे केंद्र

भारतीय रेल्वेने या व्हायरल व्हिडिओबाबत निवेदन जारी केले आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय रेल्वेच्या ‘फर्स्ट एसी’ (First AC) केबिनमध्ये फुगे आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट केल्याचे दिसत आहे. निवेदनात म्हटले आहे की, “6 जुलै 2024 रोजी ‘नंदीग्राम एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक 11002) मधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने त्यांच्या ‘फर्स्ट एसी’ कूपच्या सजावटीसाठी ऑनलाइन पद्धतीने एका डेकोरेटरची खासगीरीत्या नेमणूक केली होती. जालना स्थानकावर त्या डेकोरेटरचा डब्यातील प्रवेश अनधिकृत होता. याकडे एक गंभीर चूक म्हणून पाहिले जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच, रेल्वेगाडीत अनधिकृत प्रवेश करणे, विनातिकीट प्रवास करणे आणि अनधिकृतपणे प्रवेश करणे यांसाठी रेल्वे कायद्यातील विद्यमान तरतुदींनुसार त्या डेकोरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number