Wednesday, July 09, 2025 08:55:52 PM

नागपुरात इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग;157 प्रवासी सुखरूप

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बच्या धमकीमुळे मंगळवारी घबराट पसरली. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, नागपूर विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

नागपुरात इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग157 प्रवासी सुखरूप

नागपूर: कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बच्या धमकीमुळे मंगळवारी घबराट पसरली. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, नागपूर विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमानाची तपासणी करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी सकाळी 9:20 वाजता, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान क्रमांक 6ई 2706 मध्ये जेव्हा बॉम्बची धमकी मिळाली, तेव्हा या विमानाला त्वरित नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये धमकी गंभीर असल्याची पुष्टी करण्यात आली. कारण त्यात फ्लाइट नंबर देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी, फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-379 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ही माहिती फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री