Talukas Drought List Maharashtra: दीर्घ कालावधीपासून पावसाची वाट पाहणाऱ्या आणि पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर 1’ निकषाच्या आधारे अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष पिकांचे पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील सुमारे 75 टक्के भागात तातडीने प्रशासकीय व आर्थिक मदत पोहोचवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक प्रभावित क्षेत्र
राज्य शासनाने जाहीर केलेल्या या यादीत कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहाही महसुली विभागांतील विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक 74 तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. याशिवाय अमरावती विभागातील 56, नाशिक विभागातील 49, नागपूर विभागातील 39, पुणे विभागातील 35 आणि ठाणे विभागातील 12 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, नांदेड आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यांवर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडणार आहे.
1. ठाणे विभाग (एकूण 12 तालुके)
रायगड (1): श्रीवर्धन
रत्नागिरी (3): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग (8): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
2. नाशिक विभाग (एकूण 49 तालुके)
नाशिक (10): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे (4): धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर
जळगाव (15): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदूरबार (6): अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर (14): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता
3. पुणे विभाग (एकूण 35 तालुके)
पुणे (8): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर (11): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली (4): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ
सातारा (6): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर (6): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
4. छत्रपती संभाजीनगर विभाग (एकूण 74 तालुके)
छत्रपती संभाजीनगर (9): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना (8): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड (11): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर (10): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
धाराशिव (8): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
नांदेड (14): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
परभणी (9): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली (5): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
5. अमरावती विभाग (एकूण 56 तालुके)
बुलढाणा (13): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती (14): अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर
अकोला (7): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
वाशीम (6): वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ (16): यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
6. नागपूर विभाग (एकूण 39 तालुके)
वर्धा (7): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
नागपूर (14): नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा (3): भंडारा, पवनी, लाखांदूर
गोंदिया (1): तिरोडा
चंद्रपूर (12): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा
गडचिरोली (2): गडचिरोली, मोर्शी
सरकारी सवलतींचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत निधी
पंचनाम्यांच्या क्लिष्ट प्रक्रियेत वेळ न घालवता थेट दुष्काळ जाहीर झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ वेगाने मिळणार आहे. या निर्णयांतर्गत संबंधित तालुक्यांमधील जमीन महसुलात सूट, कृषी कर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सवलत आणि शेतीशी निगडित वसुलींना स्थगिती यांसारख्या सवलती लागू होतील. स्थानिक पातळीवर प्रशासनाला आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, बळीराजाला आर्थिक सावरण्यासाठी हे पाऊल अत्यंत निर्णायक ठरणार आहे.