मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड परिसरातील एका फळ विक्रेत्याचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित विक्रेता फळांवर उंधिर मारण्याचे विषारी औषध लावत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो थेट मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ करणारा आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या या रसायनामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारे विषारी पदार्थ फळांवर लावून विक्री करणे हा गुन्हा असून संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.