जळगावमध्ये भीषण दुर्घटना! क्रेन मशीन थेट पुलावरून खाली कोसळली; चालकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Jalgaon Accident : जळगावमधील पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलावर भीषण दुर्घटना घडली. पुलाला जोडणारा रस्ता आणि क्रेन मशीन खाली कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मधुकर धनराज पाटील असं मृत व्यक्तीचं नाव असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव अपघात
Jalgaon Accident

जळगाव : जळगावमधील पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलावर आज भीषण अपघात घडलेला आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपास पुलाला जोडणार हा रस्ता आणि क्रेन मशीन थेट पुलावरुन खाली कोसळले. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

नेमका अपघात घडला कसा?
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी या गावाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर तरसोदकडे जाणाऱ्या मार्गावर ही संपूर्ण घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मधुकर धनराज पाटील असे असून ते क्रेन मशीन चालक होते, असे सांगण्यात येत आहे. क्रेनसह भरावाचा भाग ही अचानक कोसळल्याने हा संपूर्ण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले आहे.

बायपासच्या कामावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, याच बायपासवर काही दिवसांपूर्वी आसोदा या गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूचा भराव कोसळला होता. त्याच ठिकाणी सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यातच आता पुन्हा पाळधी येथे भराव कोसळल्याने या बासपासच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या अपघातामुळे बायपासवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version