Jalgaon Crime : धक्कादायक! पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, दोन दिवसांपूर्वीच…

जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात बुधवारी एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

Jalgaon Crime : धक्कादायक! पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, दोन दिवसांपूर्वीच…

जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात बुधवारी एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, प्राथमिक पुराव्यांवरून हा निर्घृण खून असल्याचे समोर येत आहे. बुधवारी, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 1वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगलात संशयास्पद मृतदेह दिसून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मृत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला आहे. त्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे बिअरची बाटली देखील आढळून आली आहे.

यामुळे मारेकऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केला असावा किंवा महिलेला गुंगीचे पेय देऊन तिची हत्या केली असावी, असा संशय बळावला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुराव्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदीवरून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पद्मालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

youtu.be/OOhofOzvuZQ?si=fv9-2E21mBopgKuH

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number