Jalgaon Heat: जळगावात तापमानाचा पारा वाढला, वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणाचा अनोखा उपाय

जळगावात वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर गरम होण्याचा धोका वाढला आहे.

Jalgaon Heat: जळगावात तापमानाचा पारा वाढला, वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणाचा अनोखा उपाय

जळगाव जिल्ह्यात सध्या कडाक्याच्या उन्हाचा तडाखा जाणवत असून तापमान 40 ते 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांवरच नाही, तर वीज वितरण व्यवस्थेवरही होत आहे. विशेषतः ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल गरम होऊन तांत्रिक बिघाड होण्याचा धोका वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर महावितरणने एक अनोखा आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. जळगावातील नशिराबादसह अनेक उपकेंद्रांमध्ये ट्रान्सफॉर्मरसमोर थेट कूलर लावण्यात आले आहेत. या उपायामुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होत असून, उष्णतेमुळे होणारे संभाव्य बिघाड टाळले जात आहेत.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल अत्यंत तापल्यास त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. काही वेळा ट्रान्सफॉर्मर जळण्याचाही धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कूलिंगची व्यवस्था करणे आवश्यक ठरते. महावितरणच्या या उपक्रमामुळे ट्रान्सफॉर्मर थंड राहून त्यांचे आयुष्यही वाढण्यास मदत होत आहे.गेल्या वर्षीही अशाच प्रकारच्या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा आधीच खबरदारी घेत महावितरणने ही विशेष योजना राबवली आहे. या उपायामुळे वीजपुरवठा अखंडित ठेवण्यास मदत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने महावितरणकडून अशा उपाययोजना आणखी वाढवण्याचा विचार सुरू आहे. नागरिकांनीही वीज वापरात संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number