गणेश जाधव, प्रतिनिधी
जालना: जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या गवळीवाडी गावात अवैध गर्भलिंगनिदान करणारे रॅकेट उघडकीस आलय, आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईत हा अवैध आणि बेकायदेशीर धंदा उघडकीस आला. भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या गवळीवाडी शिवारात एका पत्र्याच्या गोठ्यात अनेक महिन्यांपासून अवैधपणे सुरू असलेल्या गर्भलिंगनिदान रॅकेटचा बुधवारी सायंकाळी (26 नोव्हेंबर) पर्दाफाश करण्यात आला. जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून दोन संशयितांना अटक केली आहे. छाप्यावेळी तीन महिला गर्भलिंग निदानासाठी आल्याचे आढळले.
गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागा स ह आरोग्य विभागाच्या पथकांनी कारवाई केली. है ठिकाण जिल्हा परिषद वस्ती शाळेच्या भिंतीला लागून आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सतीश बाळू सोनवणे (रा. छत्रपती संभाजीनगर) याला गोठ्यात अवैध गर्भलिंगनिदान होत असल्याची माहिती होती. तो या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथे यापूर्वी आढळलेल्या गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणांत तो आरोपी राहिला आहे. दुसरा संशयित केशव हरी गावंडे (रा. भोकरदन) हा शहरातील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा मालक आहे. त्याची लॅब पोलिस ठाण्यापासून अवघ्या 50 फुटांवर आहे. अनेक महिन्यांपासून तो हा अवैध व्यवसाय करत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा: Tiger Shakti: राणीबागेत वाघ ‘शक्ती’ मृत; माहिती आठ दिवस लपवली?
कारवाईदरम्यान पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळल्या. गर्भलिंग निदानासाठी संशयित मोबाइलचा वापर करत होते. मोबाइलमध्ये गर्भलिंगनिदानासाठीचा प्रोग्रॅम होता. हायटेक किटच्या मदतीने मोबाइलमध्ये सर्व डाटा गोळा करून काही क्षणातच अहवाल (रिपोर्ट) काढला जात असे यासाठी प्रत्येकी सुमारे वीस हजार रुपये घेतले जात होते. पोलिसांनी संशयितांकडून निदान करण्याचे यंत्र, टेस्ट ट्यूब, इंजेक्शन,गर्भपाताच्या गोळ्या आणि मोबाइल जप्त केले आहेत.
या कारवाईनंतर गोठ्याचा मालक समाधान विठ्ठल चोरमारे फरार झाला आहे. गर्भलिंग निदानासाठी आलेल्या तीन महिलांचे जवाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात सहायक निरीक्षक सचिन खामगळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, विजय डिक्कर, दीपक घुगे, प्रशांत लोखंडे, इर्शाद पटेल, रमेश राठोड, रमेश काळे, सतीश श्रीवास, सोपान क्षीरसागर, गोदावरी सरोदे, सत्यभामा उबाळे, गणपत पवार तसेच जालना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकातील अॅड. सोनाली कांबळे, डॉ. विजय वाकोडे, डॉ. ज्ञानेश्वर वायाळ, डॉ. कृष्णा वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक स्नेहल साळवे, आरोग्य विभागाचे कर्मचारी संजीवन लोखंडे, मनोज जाधव आदींचा समावेश होता.