Jalgaon: धक्कादायक! आगारातून नवी कोरी लालपरीच गायब, मध्यरात्री चोरट्यांनी बस पळवली; पुढे जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

जामनेर एसटी आगारातून मध्यरात्री नवी कोरी बस चोरीला गेली.

Jalgaon: धक्कादायक! आगारातून नवी कोरी लालपरीच गायब, मध्यरात्री चोरट्यांनी बस पळवली; पुढे जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये एसटी बस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी एखादे वाहन नव्हे तर थेट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नवी कोरी बस पळवून नेली. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे एसटी प्रशासनासह परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर एसटी आगारात उभी असलेली नवीन बस अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर काढली. बस आगारातून नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, आगारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

बस घेऊन चोरटे जामनेर तालुक्यातील शहापूरच्या दिशेने गेले. मात्र, गावाजवळ पोहोचल्यानंतर बसच्या एका चाकाला पंचर झाले. त्यामुळे बस पुढे नेणे शक्य न झाल्याने चोरट्यांनी ती रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तेथून पसार झाले. सकाळी रस्त्यालगत नवी कोरी एसटी बस उभी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. त्यानंतर हीच बस जामनेर आगारातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. आगारातून एवढी मोठी बस चोरट्यांनी बाहेर काढलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे एसटी आगारातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, बस चोरीमागील आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number