Monday, May 11, 2026 11:15:24 AM

Jay Pawar On Rohit Pawar Statement : "आता पवार विरुद्ध पवार लढाई नको", जय पवार यांच्या विधानाने खळबळ, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

रोहीत पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर जय पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावर युगेंद्र पवार यांच्यानंतर आता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

jay pawar on rohit pawar statement  quotआता पवार विरुद्ध पवार लढाई नकोquot जय पवार यांच्या विधानाने खळबळ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार

सर्वत्र राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजत आहे. दरम्यान आज बारामती पोट निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत असून पवार कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अद्याप मतदान पार पडले नसतानाच 2029 ला पवार विरुद्ध पवार असा सामना होईल अशी शक्यता आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे.

2024 ला अजित दादा सोबत पवार विरुद्ध पवार झालेच होते त्यामुळे 2029 ला ही शक्यता नाकारता येत नाही असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात असलेले पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्र दिसून आलं. त्यातच, रोहित पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रोहीत पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर जय पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावर युगेंद्र पवार यांच्यानंतर आता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- Prajakt Tanpure: शरद पवारांची साथ सोडून प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार?; पोटनिवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट केली भूमिका

यावेळी बारामतीत पत्रकार परिषद घेत जय पवार म्हणाले की, "रोहित दादा काही तरी बोलले त्यावर युगेंद्र दादा काय बोलले, की आम्ही आधीच्या काळात पण असं लढायला नको हवं होत. त्यांनी त्यांची इच्छा तिथे व्यक्त केली. मला पण तसचं वाटतं की, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलोय... माझं आणि युगेंद्र दादाचं बोलण झालं आमची दोघांची नाही तर पुर्ण पवार कुटुंबाची अशी इच्छा आहे की, आम्ही सर्व एकत्र रहाव. 2029 च्या निवडणुकीत रोहित दादा असं म्हणाले की, पवार विरुद्ध पवार होणार पण तशी आमची कोणाचीही तशी इच्छा नाही..." तसंच विलीनीकरनावर बोलताना जय पवार म्हणाले की, ते दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील त्यात आम्ही काही बोलणार नाही. 


सम्बन्धित सामग्री