‘…गेल्या जवळपास 35 ते 40 वर्षांपासून’, जयंत पाटील यांची अजित पवारांच्या अचानक निधनावर भावुक पोस्ट; म्हणाले, ‘सर्वात वाईट..’

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अजून खूप मोठे कार्य अजितदादांकडून अपेक्षित असतानाच काळाने घातलेला हा घाला कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेला आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

‘…गेल्या जवळपास 35 ते 40 वर्षांपासून’, जयंत पाटील यांची अजित पवारांच्या अचानक निधनावर भावुक पोस्ट; म्हणाले, ‘सर्वात वाईट..’

Jayant Patil’s Reaction on Ajit Pawar’s Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अतिशय भावुक पोस्ट केली आहे. “राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. अजित पवार आणि त्यांचे गेल्या 35 ते 40 वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घ काळ सत्तेत आणि संघटनेत एकत्र काम केल्यामुळे ‘दादां’चे अचानक जाणे त्यांना सुन्न करून गेले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अजून खूप मोठे कार्य अजितदादांकडून अपेक्षित असतानाच काळाने घातलेला हा घाला कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेला आहे.

मैत्री आणि सहकार्याची 4 दशके संपली, उत्तम प्रशासकाची कायमची एक्झिट
जयंत पाटील यांनी अजित पवार यांचा उल्लेख “महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तम प्रशासक आणि अत्यंत मोठा लोकनेता” असा केला आहे. राज्याच्या सार्वजनिक जीवनाचे यामुळे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनावरील दादांची पकड आणि त्यांचा कामाचा झपाटा याची उणीव कायम भासत राहील, असे त्यांनी नमूद केले. अजित पवार आज सकाळी 8:45 च्या सुमारास बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने येत होते. लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आणि त्यात दादांसह एकूण 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला.

हेही वाचा – Ajit Pawar Death : ‘मी त्यांच्या विरोधात जीव तोडून लढले.. पण आज खूप वाईट घडलं’; अजित पवारांना अंजली दमानियांनी वाहिली श्रद्धांजली

सुप्रिया सुळेंचा ‘तो’ एका शब्दाचा टाहो
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गेलेल्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर फक्त “DEVASTATED” (उद्ध्वस्त) असा शब्द लिहून आपल्या भावनांना वाट करून दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी नेहमीच आपल्या मोठ्या भावाप्रती प्रेम व्यक्त केले होते. बातमी मिळताच त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या असून, पवार कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर पाहून संपूर्ण राज्य हळहळत आहे.

राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त
अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. 1982 पासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास अशा वळणावर संपेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी ‘दादां’च्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. उद्या बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, या दुःखद प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र पवार कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे.

हेही वाचा – Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number