Keshav Upadhye : ‘उद्धव ठाकरेदेखील बिनविरोध आमदार झाले होते’; केशव उपाध्याय यांनी बिनविरोध उमेदवार निवडीवरुन ठाकरेंवर साधला निशाणा

राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.

Keshav Upadhye : ‘उद्धव ठाकरेदेखील बिनविरोध आमदार झाले होते’; केशव उपाध्याय यांनी बिनविरोध उमेदवार निवडीवरुन ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई : राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. उमेदवारी न मिळल्याने नाराजीनाट्य, बंडखोरी, पक्षांतर हे सहजरित्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच महायुतीचे बहुतांश उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यावर उद्धव ठाकरेंसह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली असून त्याला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा : Ladaki Bahin Yojana: तुमची ई-केवायसी झालीय? तरीही थांबू शकतात पैसे; लाडकी बहीण योजनेचा ‘हा’ नवा नियम तुमची झोप उडवणार

काय म्हणाले आहे केशव उपाध्ये –

तेव्हा बिनविरोध असलं तरी लोकशाही होती… बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने विरोधकांना फारच त्रास होतो आहे. मात्र इतिहास सांगतो की आतापर्यंत देशात 34 खासदार आणि 298आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी तब्बल 194 एकट्या काँग्रेसचे आहेत. मग काँग्रेसने किती कोटी रुपये वाटले होते? किती यंत्रणांचा गैरवापर केला? राहिला प्रश्न नगरसेवकांचा!.. तर ठाणे महापालिकेत 1957 साली, म्हणजे तब्बल 68 वर्षांपूर्वी, तेव्हाच्या एकूण 34 नगरसेवकांपैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. हे सर्व उमेदवार संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील होते. आणि दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे हे देखील बिनविरोध आमदार झाले होते. तेव्हा ना लोकशाही धोक्यात आली होती, ना पैशांचा खेळ झाला होता… इतिहास सोयीचा नसतो म्हणून त्याला बदनाम करता येत नाही… तेव्हा बिनविरोध लोकशाही होती, आज तीच लोकशाही भीतीदायक वाटते… हे दुटप्पीपण नाही तर काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number