Kisan Vikas Patra: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची खास योजना; लहान रक्कम गुंतवा आणि मिळवा लाखोंचा नफा

भारतातील ग्रामीण व शहरी भागात आजही अनेक कुटुंबे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर विश्वास ठेवतात.

Kisan Vikas Patra:  शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची खास योजना; लहान रक्कम गुंतवा आणि मिळवा लाखोंचा नफा

Kisan Vikas Patra : भारतातील ग्रामीण व शहरी भागात आजही अनेक कुटुंबे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर विश्वास ठेवतात. बँकांमध्ये विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असले तरी सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा यामुळे पोस्टाच्या योजना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra – KVP).

कमी रक्कमेत गुंतवणुकीची संधी

किसान विकास पत्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही योजना फक्त 1,000 रुपयांपासून सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही वरची मर्यादा नाही. म्हणजेच, शेतकरी, मध्यमवर्गीय किंवा लहान गुंतवणूकदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकतात.

गुंतवणुकीत दुप्पट परतावा

या योजनेतील आकर्षक बाब म्हणजे चक्रवाढ व्याजाचा लाभ. सध्या KVP वर वार्षिक 7.5 टक्के व्याजदर मिळतो. म्हणजेच तुमची गुंतवणूक 9 वर्षे 6 महिन्यांत दुप्पट होते. उदाहरणार्थ, 1 लाख रुपये गुंतवल्यास सुमारे 9.5 वर्षांनी 2 लाख रुपये परत मिळतात. या गणनेत दरवर्षी मिळणारे व्याज मूळ रकमेत जोडले जाते, त्यामुळे वर्षागणिक परताव्याची रक्कम वाढत राहते.

हेही वाचा: Rabi Crops MSP Hike: मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत केली ‘एवढी’ वाढ

खातं उघडण्याची सोपी पद्धत

किसान विकास पत्रामध्ये कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावाने किंवा नातेवाईकाच्या नावाने खाते उघडू शकते. एवढंच नव्हे तर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही खाते सुरू करता येते. म्हणजे कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वतंत्र गुंतवणुकीची सोय होते. याशिवाय, एका व्यक्तीला अनेक खाती उघडण्यावरही बंधन नाही.

जोखमीपासून पूर्णपणे सुरक्षित

किसान विकास पत्र योजना ही भारतीय पोस्ट ऑफिस आणि केंद्र सरकारच्या हमीने चालवली जाणारी योजना आहे. त्यामुळे यात भांडवल बुडण्याचा धोका नाही. खासकरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही योजना एक विश्वासार्ह व दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय ठरते.
 

हेही वाचा: RBI चा महत्त्वाचा निर्णय ; दिलेल्या दिवशीच चेकचे पैसे खात्यात जमा होणार

कोणासाठी फायदेशीर?

  • दीर्घकालीन बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी

  • निवृत्ती नंतरची सुरक्षितता पाहणाऱ्यांसाठी

  • शेतकरी व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी

  • मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करणाऱ्यांसाठी

आजच्या अस्थिर आर्थिक बाजारात, स्थिर व सुरक्षित परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी किसान विकास पत्र हा उत्तम पर्याय ठरतो. फक्त 1,000 रुपयांपासून सुरुवात करून दुप्पट परतावा मिळवण्याची हमी या योजनेत आहे. त्यामुळे, सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टाची ही योजना नक्कीच उपयुक्त ठरेल.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number