Kolhapur Crime : चिमुकलीच्या बारशाची लगबग अन् आईने उचललं टोकाचं पाऊल, माहेरच्यांना घातपाताचा संशय

कोल्हापुरातील राजारामपुरी येथे महिनाभराच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहित महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करत सासरच्या मंडळींवर कारवाईची मागणी केली असून पोलिसांकडून तपास

Kolhapur Crime : चिमुकलीच्या बारशाची लगबग अन् आईने उचललं टोकाचं पाऊल, माहेरच्यांना घातपाताचा संशय

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात एका विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. महिनाभराच्या मुलीच्या बारशाची तयारी घरात सुरू असतानाच संबंधित महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मृत महिलेचे नाव अस्मिता प्रतीक्षा काटकर असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना राजारामपुरी परिसरातील काटकर पार्क येथे घडली. अस्मिता आणि प्रतीक काटकर यांचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. घरात नवजात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Palghar Flood Update : काळीज पिळवटणारी घटना! चारही बाजूंनी पाणी, मृतदेहासह कुटुंबाला छतावर काढावी लागली रात्र

घटनेनंतर अस्मिताच्या नातेवाईकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी अस्मिताच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. तसेच तिचा विवाहानंतर सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अस्मिताला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. या प्रकरणात पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानेही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा:Hapur Acid Incident: दागिन्यांच्या दुकानात भीषण दुर्घटना; पाण्याची बाटली समजून तरुणीने प्यायलं ॲसिड, एका घोटात…

या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी सर्व संबंधितांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली असून नवजात मुलीच्या बारशाच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील सत्य समोर येणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number