Tuesday, November 18, 2025 09:34:20 PM

Kokan Railway : रेल्वे प्रशासनाचा दिलासा!; सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे आठ गाड्यांना मिळाले नवे थांबे

सणासुदीच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग आणि कणकवली प्रवाशांना आता सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

kokan railway  रेल्वे प्रशासनाचा दिलासा सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे आठ गाड्यांना मिळाले नवे थांबे

मुंबई : कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आठ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली स्थानकांवर अधिकृत थांबा मिळणार आहे. रेल्वे मंडळाने यास मान्यता दिली असून, या निर्णयामुळे सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पूर्वी कोकण रेल्वेवरील अनेक महत्त्वाच्या गाड्यांना प्रमुख स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. विशेषतः स्थानिक प्रवासी आणि कोकणात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी थांबे वाढवण्याची मागणी सातत्याने केली होती. शेवटी, रेल्वे प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेत निर्णय घेतला असून, या थांब्यांची अंमलबजावणी 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या

रेल्वे क्रमांक 12977/78 मरूसागर एक्सप्रेस आणि 22655/56 एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकात 2 मिनिटांचा थांबा मंजूर करण्यात आला आहे.

  • गाडी क्रमांक 12977 (एर्नामुल जंक्शन–अजमेर एक्सप्रेस) ला 2 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग येथे थांबा असेल.

  • गाडी क्रमांक 12978 (अजमेर–एर्नामुल जंक्शन एक्सप्रेस) ला 7 नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे.
    ही गाडी सकाळी 11.43 वाजता थांबेल आणि 5 मिनिटांनंतर पुढे रवाना होईल.

  • गाडी क्रमांक 22655 ला 5 नोव्हेंबरपासून सकाळी 7.08 वाजता थांबा असेल,
    तर 22656 ला 7 नोव्हेंबरपासून सकाळी 7.20 वाजता थांबा मिळणार आहे.

हेही वाचा: Stray Dogs Attacks: सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांवरील कारवाईबाबत स्पष्टीकरण मागवले; सर्व राज्यांचे मुख्य सचिव आज न्यायालयात राहणार हजर

कणकवली स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या

कणकवली स्थानकासाठी देखील रेल्वेने चार गाड्यांचे थांबे निश्चित केले आहेत.

  • 22475 (हिसार–कोइम्बतूर–हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस) ला 5 नोव्हेंबरपासून रात्री 9.43 वाजता थांबा मिळेल.

  • 22473 ला 8 नोव्हेंबरपासून त्याच वेळेस थांबा असेल.

  • 16335 (गांधीधाम–नागरकोईल एक्सप्रेस) ला 7 नोव्हेंबरपासून रात्री 9.48 वाजता थांबा देण्यात आला आहे.

  • तर 16336 (नागरकोईल–गांधीधाम एक्सप्रेस) ला 11 नोव्हेंबरपासून सकाळी 6.30 वाजता थांबा मिळेल, आणि ही गाडी 6.32 वाजता पुढे निघेल.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांनी तिकीट आरक्षण करताना या नव्या थांब्यांची माहिती तपासावी. कोकण रेल्वे विभागाने सांगितले की हा निर्णय सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी गर्दीचा विचार करून घेतला आहे. यामुळे सिंधुदुर्ग, कणकवली आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे.

कोकण रेल्वेने या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांच्या दीर्घकाळाच्या मागणीला न्याय मिळाल्याचं सांगितलं असून, येत्या काळात प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होण्यासाठी आणखी सुधारणा केल्या जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: Unique Station India: आता व्हिसाची कटकट विसरा; 'या ' स्टेशनवर उतरलं की काही मिनिटांतच परदेशात प्रवेश


सम्बन्धित सामग्री