राज्यातील कृषी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ दिवस ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार; शासन निर्णय जारी

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 22 ऑक्टोबर 2026 रोजी या ऐतिहासिक निर्णयाचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे.
राज्यातील कृषी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ दिवस ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार; शासन निर्णय जारी
Dattatray Bharne announcement

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 डिसेंबर हा दिवस आता राज्यभरात ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 22 ऑक्टोबर 2026 रोजी या ऐतिहासिक निर्णयाचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी पदवीधर, संशोधक आणि युवा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या बहुप्रतिक्षित मागणीला यश

राज्यातील ‘अॅग्रीकॉस’ म्हणजेच कृषी विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरी करण्याची ठाम मागणी होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशात कृषी विद्यापीठांची पायाभरणी करणे, भारतीय कृषी संशोधन परिषदेची (ICAR) पुनर्रचना करणे आणि 1955 मध्ये ‘भारत कृषक समाज’ या शेतकरी संघटनेची स्थापना करून कृषी क्रांती घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या दूरदृष्टीचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच नवीन पिढीला कृषी संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा – 24 तासांचा प्रवास 16 तासांत पूर्ण होणार! महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी धावणार; तिकीट आणि थांबे जाणून घ्या

सध्याच्या काळात कृषी क्षेत्रासमोर हवामान बदल, पाण्याचे दुर्भिक्ष आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारखी मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शेती आणि नवीन संशोधनाच्या माध्यमातून शेतीला सक्षम करण्याची मोठी जबाबदारी युवा कृषी विद्यार्थ्यांवर आहे. हा विशेष दिवस साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव होईल आणि शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version