Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेचा हफ्ता थांबला? 54 लाख महिलांचा लाभ बंद; तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेचा हफ्ता थांबला? 54 लाख महिलांचा लाभ बंद; तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांच्या प्रतीक्षेचा विषय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही लाभार्थी महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आल्यानंतर 'आपला लाभ बंद झाला का?' असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राज्य सरकारकडून योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ई-केवायसी आणि इतर कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ते जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या लाखो महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरत आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना एकदम 4500 रुपये मिळणार'; आठच दिवसात सरकार तातडीने घेणार 'हा' निर्णय, वाचा सविस्तर

महिलांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज आणि हप्त्याची स्थिती तपासता येणार आहे. यासाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. अर्जदार लॉगिनमध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर ‘अर्जाची स्थिती’ किंवा ‘लाभार्थी यादी’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकताच अर्ज मंजूर आहे की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

फेब्रुवारी महिन्यानंतर अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलचे एकत्रित ₹3000 मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. काही महिलांना तीन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: EPFO 3.0: आता PF चे पैसे काढणे होणार सोपे; ATM आणि UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा 'या' तारखेपासून होणार सुरू

महिला व बालविकास विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जात असून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाला गती मिळेल, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरूनच आपली माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ सुरू राहणार की बंद होणार, याबाबत स्पष्टता येण्यासाठी आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number