मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे.सरकारने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधीचे वितरण केले असून, आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
339 कोटींचा निधी वितरित
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाने या हप्त्यासाठी 339 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. शासन निर्णय (GR) जारी झाल्यानंतर हा निधी थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात DBT द्वारे पाठवला जात आहे.राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
मेसेज आला नसेल तर काय कराल?
आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आहे का, ते त्वरित तपासावे. जर मेसेज आला नसेल तर –
1. आपल्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून चौकशी करा.
2. जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक एंट्री करून घ्या.
सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.