Sunday, June 15, 2025 10:39:32 AM

मद्यप्रेमींच्या खिशाला फटका; भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ

मद्य शौकीनसाठी सरकारने एक मोठा झटका दिला आहे. राज्यभरात दारू महागली जाणार आहे. यासोबतच, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ होणार आहे.

मद्यप्रेमींच्या खिशाला फटका भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ

मनोज दयाळकर. प्रतिनिधी. मुंबई: मद्य शौकीनसाठी सरकारने एक मोठा झटका दिला आहे. राज्यभरात दारू महागली जाणार आहे. यासोबतच, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच, हॉटेलमध्ये दुकानाप्रमाणे दारूही विकता येईल. कराराद्वारे, रेस्टॉरंटला भाडेतत्त्वावर विदेशी दारू विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महसूल वाढवण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रातील तळीरामांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. तसेच, सरकारच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात दारू महाग झाली आहे. तसेच, राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोणतं मद्य कितीला मिळणार?

180 मिली मद्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तसेच, देशी मद्यची किंमत 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर मद्यची किंमत 148 रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्यची किंमत 205 रुपये, विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड मद्यची किंमत 360 रुपयांनी महाग झाली आहे. सोबतच, सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. 

विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क  विभागात 1223 पद नव्याने भरले जाणार असून राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार आहे. तर मुंबई उपनगर ,ठाणे, पुणे, नाशिक ,नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहे. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे. 

 


सम्बन्धित सामग्री