कोरोनानंतर लोणार सरोवर पर्यटनासाठी पुन्हा खुले

कोरोनानंतर लोणार सरोवर पर्यटनासाठी पुन्हा खुले

लोणार, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात उल्कापाताच्या आघातातून ५२ हजार वर्षांपूर्वी खाऱ्या पाण्याचं सरोवर निर्माण झाले आहे. या सरोवराला लोणार सरोवर असे म्हणतात. पर्यटक, अभ्यासक तसेच शास्त्रज्ञांसाठी लोणार सरोवर ही एक खुली प्रयोगशाळा आहे.

बुलढाणा जिल्ह्याला जागतिक पातळीवर कीर्ती मिळवून देणाऱ्या लोणार सरोवर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोना काळापासून बंद असलेले लोणार सरोवर तसेच परिसरातील मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. श्रावण मास सुरू झाला आहे. या निमित्ताने लोणार सरोवर परिसरातील गोधार पण पर्यटक आणि भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. पण गोधार कायमस्वरुपी खुली करण्याची मागणी भाविक आणि पर्यटक करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version