LPG Latest Updates : 1 मे पासून सिलिंडरच्या नियमात मोठे बदल! बुकिंग, डिलीव्हरी ते दरांसंदर्भात मोठी अपडेट

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. अशातच 1 मे पासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत.

LPG Latest Updates : 1 मे पासून सिलिंडरच्या नियमात मोठे बदल! बुकिंग, डिलीव्हरी ते दरांसंदर्भात मोठी अपडेट

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किमतीत झालेली वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला चटके देणारी ठरत आहे.

देशात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा साठा पुरेसा असून पुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची अतिरिक्त खरेदी (Panic-buying) करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी गॅस बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा आणि सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा पीएनजी (PNG) सारख्या पर्यायी इंधनांकडे वळण्याचे प्रोत्साहनही सरकारकडून दिले जात आहे.

हेही वाचा- Gold Silver Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! दरांमध्ये मोठी घसरण, सोने-चांदीचे आजचे दर पाहा

1 मे पासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. या बदलात बुकिंगचा कालावधी, डिलीव्हरीची पद्धत आणि दरांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार डिलीव्हरी घेताना केवळ पैसे देऊन चालणार नाही तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक डिलिव्हरी डीएसी कोड पाठवला जाईल. हा कोड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दिल्याशिवाय डिलिव्हरी यशस्वी मानली जाणार नाही.

तसेच ग्राहकाला एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसाचे अंतर ठेवावे लागेल. तर उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना हा कालावधी 45 दिवसाचा असण्याची शक्यता. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर मध्ये 60 रुपयांनी वाढ होऊन त्याची किंमत हजारावर जाण्याची शक्यता असून 19 किलो सिलिंडरच्या दारातही वाढ होण्याचे संकेत आहेत. केवायसी अपडेट नसेल तर गॅस बुकिंग रोखले जाऊ शकते किंवा मिळणारी सबसिडी बंद होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number