Friday, February 13, 2026 10:58:16 AM

Devendra Fadanvis : 'आपण देशाच्या विकासाचे इंजिन...', मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोड मॅप

ध्वजाला मानवंदना देऊन राज्याच्या विकासाबद्दल आणि विकासकामांबद्दल भाष्य केले आहे.

devendra fadanvis  आपण देशाच्या विकासाचे इंजिन मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोड मॅप

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजाला मानवंदना देऊन राज्याच्या विकासाबद्दल आणि विकासकामांबद्दल भाष्य केले आहे. 

फडणवीस म्हणाले की, "आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. 

पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून भारताच्या विकासाचे इंजिन आहे. आगामी काळात ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल". 


सम्बन्धित सामग्री