मुंबई: आज, सोमवारी 5 मे 2025 रोजी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन उपलब्ध होईल. राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधीच विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणाव दिसून येत आहे.
नऊ विभागीय मंडळांचे निकाल ऑनलाईन उपलब्ध
पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. यामुळे घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावरून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील.
गेल्यावर्षी मुलींची बाजी, यंदा काय चित्र असेल?
2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मुलींनी वर्चस्व गाजवत 95.44 टक्के उत्तीर्णता मिळवली होती. याच्या तुलनेत मुलांचा निकाल 91,60 टक्के होता. त्यामुळे यंदाही मुलींचा वर्चस्व राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर विभागात निकालाची धाकधूक, दीड लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर विभागातून तब्बल 1 लाख 58 हजार 537 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी आहेत. परीक्षा वेळेत पूर्ण झाल्यामुळे यंदा निकाल 15 दिवस आधीच जाहीर होतो आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयीचा तणाव वाढलेला आहे.
गेल्यावर्षीचा निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल
२०२४ चा एकूण निकाल 93.37 टक्के होता. यामध्ये कोकण विभागाने 95.21 टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले होते. मुंबई विभाग मात्र सर्वांत कमी 91.95 टक्के निकालासह शेवटच्या स्थानावर होता.
निकाल कसा पाहाल? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – mahahsscboard.in किंवा hscresult.mkcl.org
2. ‘महाराष्ट्र HSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.
3. आपला सीट क्रमांक आणि आईचे नाव भरा.
4. ‘Submit’ बटणावर क्लिक केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.
5. निकालाची प्रत डाऊनलोड करून सेव्ह करता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स:
http://hscresult.mkcl.org
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http:// http://hscresult.mkcl.org