Thursday, May 22, 2025 06:08:29 PM

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2025 अपडेट: लवकरच जाहीर होणार निकाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिकांचे अंतिम मूल्यांकन सुरू असून लवकरच मंडळाकडून अधिकृत तारीख घोषित होणार आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2025 अपडेट लवकरच जाहीर होणार निकाल जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीची परीक्षा यंदा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सध्या उत्तरपत्रिकांचे अंतिम मूल्यांकन सुरू असून निकाल प्रक्रियेची कामगिरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता आणि थोडी चिंता देखील दिसून येत आहे. निकाल कधी जाहीर होईल, याची वाट सर्वजण आतुरतेने पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच म्हणजे येत्या काही दिवसांत मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार ग्रेडदेखील दिली जाणार आहे. मंडळाच्या ग्रेडिंग पद्धतीनुसार, 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 'डिस्टिंक्शन' मिळेल, तर 60 टक्के ते 74 टक्के गुण मिळवणाऱ्यांना 'प्रथम श्रेणी' प्राप्त होईल. तसेच 45 टक्क्यांपासून 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना 'द्वितीय श्रेणी' मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने 35 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवले, तर त्याला पुरवणी परीक्षेला सामोरे जावे लागेल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स (List of Websites to Check Maharashtra Board HSC Result 2025):
1) mahahsscboard.in
2) hsc.mahresults.org.in
3) hscresult.mkcl.org
4) msbshse.co.in
5) mh-ssc.ac.in
6) sscboardpune.in
7) sscresult.mkcl.org
8) mahresult.nic.in

हेही वाचा:24 वर्षांनंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुर्मिळ अक्षय योग; या 4 राशींना होईल विशेष लाभ

महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2025 कसा तपासायचा? (Steps to Check Maharashtra HSC Result 2025 Online):

-सर्वप्रथम mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
-'HSC Result Link' वर क्लिक करा.
-आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव योग्य प्रकारे टाका.
-माहिती भरल्यानंतर 'View Result' वर क्लिक करा.
-आपली गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल, ती डाऊनलोड करून सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल मिळवण्याची प्रक्रिया (How to Get Maharashtra HSC Result 2025 via SMS):

-आपल्या मोबाईलवर MHSSC असे टाईप करा.
-5776 या क्रमांकावर पाठवा.
-काही क्षणात तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारे मिळेल.

डिजीलॉकरद्वारे निकाल पाहण्याची पद्धत (How to Check Result on Digilocker):

-डिजीलॉकर अ‍ॅप किंवा वेबसाइटवर लॉगिन करा.
-महाराष्ट्र बोर्डचा पर्याय निवडा.
-आपला सीट नंबर प्रविष्ट करा आणि गुणपत्रिका डाउनलोड करा.

यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वच अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. निकालाची अधिकृत घोषणा होताच, सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पाहता येईल. त्यामुळे दररोज अधिकृत वेबसाइट्सवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
 


सम्बन्धित सामग्री