Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या स्मृतींना सरकारकडून मोठा सन्मान; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि भव्य स्मारकाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि स्मारक उभारण्याची घोषणा केली.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या स्मृतींना सरकारकडून मोठा सन्मान; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि भव्य स्मारकाची घोषणा

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सभागृहाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. राज्यातील नागरी सेवा अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय अजित पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

अजितदादांच्या निधनाने कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांच्या करड्या आर्थिक शिस्तीमुळे राज्याने प्रगती केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देहू येथे सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान’ सुरू करण्यात येणार असून कृषी क्षेत्रात नवे उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Dhurandhar 2 Trailer: रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट; ‘धुरंधर द रिव्हेंज’च्या ट्रेलरची तारीख ठरली

याशिवाय ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणाही करण्यात आली. ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना’, ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ या योजनांद्वारे शेतकरी, मत्स्य व्यवसायिक आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठा आधार मिळणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. राज्याच्या विकासाला गती देण्याबरोबरच महान नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी घेतलेले हे निर्णय महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाबरोबरच शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर दिला.

हेही वाचा: Gudi Padwa 2026: यंदा ‘गुढी पाडवा’ कधी साजरा होणार? जाणून घ्या मराठी नववर्षाची तारीख आणि शुभ मुहूर्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number