Friday, June 12, 2026 10:52:28 PM

Lonavla Crime: बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती.

lonavla crime बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना  जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

पर्यटननगरी लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली असून ही घटना ऑगस्ट 2024 मध्ये घडली होती. याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. 

सध्या तिचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले. पीडितेने सुरुवातीला 3 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकरणाची फिर्याद दिली होती. मात्र, घटनेचे ठिकाण लोणावळा असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 


सम्बन्धित सामग्री