Unseasonal Rain Maharashtra: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळी नुकसानीनंतर सरकारकडून कोट्यवधींची मदत

राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Unseasonal Rain Maharashtra: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळी नुकसानीनंतर सरकारकडून कोट्यवधींची मदत

राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा करण्यात आली. अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून तब्बल 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, राज्यातील 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला. या कालावधीत सुमारे 1 लाख 45 हजार 606 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, 2 लाख 33 हजार 890 शेतकरी प्रभावित झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, प्रशासनाकडून ती जलद गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाणार आहे.

एप्रिल 2026 महिन्यातही अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या पावसामुळे सुमारे 1 लाख 94 हजार 329 शेतकऱ्यांच्या 1 लाख 22 हजार 996 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असला तरी, पुढील काळातही अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरजही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. सध्या मात्र सरकारच्या या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, लवकरात लवकर मदत मिळण्याची अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number