दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच युद्ध पातळीवर पंचनामे सुरू केले आहेत. आतापर्यंत राज्यात 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून येत्या 10-12 ऑक्टोबरपर्यंत सर्व 100 टक्के पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना भरणे यांनी ही मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मदतीसाठी तात्कळत राहावे लागणार नाही.
प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टरला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम त्वरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात 1 कोटी 49 लाख हेक्टरचे पंचनामे करण्यात आले असून जळालेल्या पिकांचेही पंचनामे करायला, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
नेमके काय म्हणाले कृषीमंत्री ?
‘आम्ही चारा आणि मदतीसाठी 17 हजार कोटींची मागणी केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मदत देणार आहे, असं सांगतानाच दुष्काळी तालुक्यात अजून 19 तालुक्यांचा समावेश केला जाणार आहे. अजून काही असतील तर वााढले जाणार आहेत. सर्वांना आर्थिक हातभार लागावा ही यामागची भूमिका आहे. मी राज्याच्या कृषी मंत्री आहे. शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे आणि डोळे पुसण्याचे काम आम्हाला करायचे आहे. आम्हाला याचं राजकारण करायचे नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 68 टक्के काम झाले आहे. कोकणात सर्वात कमी पंचनामे करण्यात आले आहेत. अमरावतीत 55 टक्के, पुण्यात 30 टक्के, नागपुरात 25 टक्के काम सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.