सध्या महाराष्ट्रात अशोक खरात हे प्रकरण खूप चर्चेत आले आहे. अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता अशोक खरातचे वैद्यकीय अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे तपासाला नवीन दिशा मिळाली आहे.
पोलिसांनी अशोक खरातची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. यावेळी त्याच्या काही टेस्टही करण्यात आल्या होत्या. यात एचआयव्ही टेस्टचाही समावेश होता. आता अशोक खरातच्या एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. अशोक खरातच्या HIV चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीयदृष्ट्या तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. यातील अनेक महिला भीतीपोटी समोर येण्यास कचरत आहेत.