Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रायगड, नाशिक घाटमाथ्यासह अनेक भागांना रेड अलर्ट; पुढील 24 तास कसे असतील?

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून रायगडसह अनेक भागांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रायगड, नाशिक घाटमाथ्यासह अनेक भागांना रेड अलर्ट; पुढील 24 तास कसे असतील?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, घाटमाथा आणि काही डोंगराळ परिसरात पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने ६ जुलै रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसासह नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला असला तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने डोंगराळ भागात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातही हवामानाचा इशारा कायम आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिकच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातही पावसाची शक्यता कायम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number