महाराष्ट्रात अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून मुंबईत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी निवडणुकीचे वेळपत्रक जाहीर केले.
राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याबाबत कोर्टाने निर्देश दिलेले आहेत
ही पत्रकार परिषद नगर परिषद आणि नगर पंचायत समित्याबाबत आहे
246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत समित्या याची निवडणूक होणार आहे
147 नगरपंचायतीपैकी 42 नगरपंचायत निवडणुका आहेत
नगरपरिषद सदस्य संख्या 20 ते 75 आहे
नगरपरिषदेचा एक सदस्य आहे, तिथे एक मतदान द्यावे लागेल
ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल
संकेतस्थळावर निर्देशन भरून मग आयोगाला देता येणार आहे
जातवैद्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे
एकूण मतदार 1 कोटी 7 लाख 376 मतदार आहेत
13 हजार 355 मतदान केंद्र आहेत
या निवडणुका evm द्वारे होणार आहेत
अध्यक्षपदासाठी 15 लाख खर्च आहे
तर सदस्यासाठी 7 लाख खर्च आहे
मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲपदेखील तयार केले आहे
दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहेत
दुबार मतदारच्या समोर डबल स्टार आलेले आहे
तो मतदार कुठल्या मतदान केंद्रात मतदान करेल, याची माहिती असेल
ज्या मतदाराच्या नावावर डबल स्टार असेल त्याच्याकडून माहिती घेतली जाईल, त्याने कुठे मतदान केले हे समजेल
दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी सोय करण्यात आली आहे
सर्व मतदान केंद्रांवर विजेची व्यवस्था, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे
मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल नेण्याची सुविधा देण्यात आली आहे
या तारखा महत्त्वाच्या
नामनिर्देशन - 10 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - 21 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर