Monday, March 09, 2026 01:55:41 AM

Best Bus For Students : आता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचण नाही, विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट'चा मोठा निर्णय

विशेषतः सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये परीक्षा असलेल्या केंद्रांच्या मार्गांवर जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

best bus for students  आता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचण नाही विद्यार्थ्यांसाठी बेस्टचा मोठा निर्णय

बारावीची बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या महत्त्वाच्या काळात विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बेस्टने विशेष नियोजन केले आहे. परीक्षांच्या दिवसांमध्ये नियमित बसफेऱ्यांबरोबरच, अतिरिक्त बसफेऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये परीक्षा असलेल्या केंद्रांच्या मार्गांवर जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 येत्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी बेस्टच्या जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. शाळा आणि पालकांकडून आलेल्या मागणीनुसार, आवश्यक त्या भागांमध्ये विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - Matheran e-Rikshwa News : मोठी बातमी! माथेरानमध्ये उद्यापासून इ-रिक्षा चालकांचा संप, स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी 

विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षा केंद्रांचे अंतर आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन बससेवेचे नियोजन करण्यात येणार आहे .यासाठी सर्व आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - Stock Market Today:शेअर बाजारात आज चांदी? 'या' कंपनीच्या नफ्यात 90 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, होणार का मोठी कमाई?

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागावे आणि त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना बेस्ट प्रशासनाने चालक, वाहक, निरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दरवाजाने प्रवेश दिला जाणार आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये लवकर चढता येईल आणि वेळेची बचत होईल.


सम्बन्धित सामग्री