मुंबईचा महापौर कोण यावरील चर्चेला आज शनिवारी विराम मिळाला आहे. मुंबईचे महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाली असून उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ५ मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज 7 फेब्रुवारी रोजी संपताना शिवसेना-भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केले. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसकडूनही महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.