नालासोपारा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा, संतोषभुवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच स्वत:च्या 15 वर्षीय मुलीला संपवलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 4 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरात आई आणि मुलगी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हे वाद अत्यंत विकोपाला गेले आणि त्या रागाच्या भरात आईने थेट आपल्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला.
हेही वाचा - College Ragging Case: कॉलेजमध्ये रॅगिंगची दहशत! सिगारेट आणण्यासाठी सक्ती करत ज्युनियर्सना लोखंडी सळ्यांनी मारहाण
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सांगितले की,सुरूवातीला मुलीची गळा चिरून हत्या केली असल्याची शक्यता वर्तवली गेली. मात्र अधिक तपास केला असता आईने घरात असलेला पाटा डोक्यात घातला असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा - मी एलॉन मस्क.. विल यू मॅरी मी?'..लग्नाच्या प्रपोजलने हुरळली महिला; पुढे जे घडलं ते वाचून हादराल!
डोक्यात जोरदार वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे.आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.