आखाती देशातील युद्धाची झळ आता उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा असून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यामध्येच कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही वाढ झाली.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ ज्यामुळे हॉटेल व्यवसायिक पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ करत आहेत. मुंबईकरांना वडापावकरिता अधिकचे पैसे माजावे लागणार आहेत.
मुंबईकरांकरिता वडापाव अत्यंत जवळचा विषय आहे. वडापावच्या किमतीत वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. मुंबईकरांना आता बटाटा वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत.
व्यवसायिक गॅस सिलिंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्याने वडापावचे दरही पाच ते सात रूपयांनी वाढणार आहेत. पावच्याही किमतीत वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा मुंबईच्या वडापावपर्यंत पोहोचल्या आहेत. जर हे युद्ध अजून काही काळ चालले तर परिस्थिती अधिक बिकड होऊ शकते.