Ration Vatap Update: अन्न पुरवठा विभागाकडून मिळाली मोठी अपडेट; रेशन कार्डधारकांना मिळणार ‘या’ वस्तू, जाणून घ्या

90 % धान्याचा साठा उपलब्ध झाला असून उर्वरित धान्य पुढील दोन दिवसांत पोहोचणार आहे.

Ration Vatap Update: अन्न पुरवठा विभागाकडून  मिळाली मोठी अपडेट;  रेशन कार्डधारकांना मिळणार ‘या’ वस्तू, जाणून घ्या

रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  एप्रिल महिन्याच्या धान्य पुरवठ्याला सुरुवात झाली असून, पुरवठा विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या सुमारे 90 % धान्याचा साठा उपलब्ध झाला असून उर्वरित धान्य पुढील दोन दिवसांत पोहोचणार आहे.

10 एप्रिलपासून सोमवार वगळता नियमित धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लाखो रेशनकार्डधारकांना दिलासा मिळणार आहे.शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा पुरवठा शहरातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात गहू आणि तांदळाचे वितरण केले जाणार आहे. तर ग्रामीण भागात धान्यासोबतच रॉकेलचेही वाटप केले जाणार आहे. शहरातील लाभार्थ्यांना मात्र रॉकेलचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा – strait of Hourmuz : जगाचं टेंशन वाढणार! आता होर्मुझ खाडीतून इतकी जहाजच पार होणार, इराणच्या निर्णयाने सर्वांना मोठा धक्का 

ज्वारी वाटपाला तात्पुरती स्थगिती 
गेल्या तीन महिन्यांपासून ज्वारीचे वाटप सुरू होते. मात्र, एप्रिल महिन्यात ज्वारीचे वितरण बंद करण्यात आले असून लाभार्थ्यांना केवळ गहू आणि तांदूळच मिळणार आहेत.

ज्या लाभार्थ्यांनी मार्च महिन्याचे धान्य घेतले नाही, त्यांना आता ते मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्याचे धान्य वेळेत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number