नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. यात भाजपने दणदणीत विजय मिळवत चांगलाच गुलाल उडवला आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले होते. या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच धरून ठेवला होता. असं असताना देखील ठाकरे बंधूंना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपने 89 जागा मिळवत ठाकरे बंधूंना धुळ चारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळाले आहे.
महापालिका निवडणूक 2026
मुंबईत असा राहिला स्ट्राईक रेट!
पक्ष : लढलेल्या जागा/जिंकलेल्या जागा/स्ट्राईक रेट
भाजपा : 135/89/66 टक्के
उबाठा : 160/65/40.62 टक्के
शिवसेना शिंदे : 90/29/32.22 टक्के
काँग्रेस : 151/24/15.89 टक्के
शरद पवार राष्ट्रवादी : 11/1/0.90 टक्के
मनसे : 53/6/0.86 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस : 37/3/0.81 टक्के
मुंबईत अशी राहिली मतांची टक्केवारी!
भाजपा : 45.39 टक्के
उबाठा : 27.37 टक्के
शिवसेना : 10.28 टक्के
काँग्रेस : 9.41 टक्के
मनसे : 2.91 टक्के
महापालिका निवडणूक 2026 : राज्यातील स्ट्राईक रेट!
भाजपा : 2209 उमेदवार/1400 विजयी/63.38 टक्के
शिवसेना : 1493 उमेदवार/410 विजयी/27.46 टक्के
राष्ट्रवादी : 1355 उमेदवार/163 विजयी/12 टक्के
उबाठा : 1275 उमेदवार/155 विजयी/12.15 टक्के
शरद पवार : 533 उमेदवार/35 विजयी/6.56 टक्के
काँग्रेस: 1359 उमेदवार/357 विजयी/26.27 टक्के
मनसे : 330 उमेदवार/12 विजयी/3.64 टक्के
एमआयएम: 423 उमेदवार/126 विजयी/29.78 टक्के
आम आदमी पार्टी : 455 उमेदवार/0 विजय/0 टक्के