Paresh Rawal on Tukaram Mundhe Transefer: बोलबाला तुकाराम मुंढेंचाच! अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी, म्हणाले, ‘खात्यातून बदली किंवा हकालपट्टी…’

बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही घेतली असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्याबाबत महत्त्वाची मागणी केली आहे.

Paresh Rawal on Tukaram Mundhe Transefer: बोलबाला तुकाराम मुंढेंचाच! अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी, म्हणाले, ‘खात्यातून बदली किंवा हकालपट्टी…’

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील नियमभंगापर्यंत विविध प्रकरणांवर त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कामाची दखल आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही घेतली असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्याबाबत महत्त्वाची मागणी केली आहे. मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली किंवा पदच्युती होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असं आवाहन रावल यांनी केलं आहे.

परेश रावल यांनी रविवारी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की,  “आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची त्यांच्या सध्याच्या खात्यातून बदली किंवा हकालपट्टी होऊ नये याची खात्री करावी. एक्सवरील पोस्टमध्ये रावल म्हणाले की, मुंढे यांचं संरक्षण करणं आणि त्यांना त्यांच्या विभागात काम करत राहण्याची परवानगी देणं हे मुख्यमंत्र्यांचं प्राधान्य आणि धर्म असलं पाहिजे”. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही मुंढे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच इतर खाद्य आस्थापनांवर तपासण्या आणि छापे टाकण्यात आले. दुधातील भेसळ, भेसळयुक्त पनीर आणि मिठाई, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच गुटख्याच्या विक्रीविरोधातही कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या कँटीनशी संबंधित कारवाईमुळेही मुंढे चर्चेत आले होते. अॅनालॉग पनीरच्या वापरावर महाराष्ट्रात बंदी घालण्याच्या निर्णयामुळेही त्यांची भूमिका ठळकपणे समोर आली. त्यामुळे त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीला आता परेश रावल यांनी दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number